“ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतय, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय..” – Eknath Shinde यांचे सडकून टीकास्त्र

“ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतय, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय..” – Eknath Shinde यांचे सडकून टीकास्त्र

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये  काल (१० ऑगस्ट ) मोठ्याप्रमाणावर मनसेसैनिकांकडून हल्लाबोल करण्यात आला. अक्षरशः उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, टोमॅटो आणि बंगाड्या फेकून मारल्या गेल्या. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालं आहे. वाहन चालकच्या दिशेने नारळ वेगाने आल्याने वाहनचालकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली. त्याच सोबत हॉलच्या आतल्या बाजूस उभे केलेले स्टॅन्ड हे मोठ्याप्रमाणावर तोडण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये मारामारीसुद्धा झाली. मात्र वाहनचालकांनी गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी कंट्रोल केली. सर्वात पुढे ताफ्यामध्ये चेंबूरचे विभाग क्रमांक ९ चे प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या गाडीवर नारळ भिरकावले असून त्याचा वाहन चालक थोडक्यात बचावला.

ठाण्यात शनिवारी रात्री मोठा राडा पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे गटाचा मेळावा ठाण्यात पार पडला जाणार होता. मात्र त्याआधी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी नारळ आणि शेण फेकले त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. या राड्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

राज ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी उबाठा गटाने चुकीचं आंदोलन केलं होतं. त्यामुळे ॲक्शनला रिॲक्शन असते ती पाहायला मिळाली. सरकार स्थापन झाल्यापासून पडणार म्हणाले पण सरकार मजबूत झालं. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला. लोकसभेलापण जर स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहे हे आम्हाला सांगायची गरज नाही. ठाण्यातील लोकांना औषध द्यायला जमतं, त्यांनी बरोबर जमलगोटा दिलाय. दिल्लीतून मातोश्रीमध्ये बैठका होत होत्या पण आता दिल्लीकडे लोटांगण घातली जात असल्याचं एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. माझ्या दाढीची त्यांना धास्ती आहे. या दाढीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली. बाळासाहेब असते तर त्यांना जंगलामध्ये फोटोग्राफीसाठी पाठवलं असतं. आत काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून कटोरा घेऊन फिरतात. माझ्या लाडक्या बहिणींना एकच सांगायचं आहे की कपटी भावापासून सावध राहा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार, CM Ekath Shinde यांची ग्वाही

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version