spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन; शिवसेना खासदारांचे पत्र, आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई काय?

शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. असं असतानाच आता आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून गणेशोत्सव कार्यक्रमानिमित्त ढोलताशा पथकावर चक्क पैशांची उधळण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत असून शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून आता यावरून राजकारण तापल्याचे दिसत आहे. केदार दिघे यांनी ट्विटरवरून सदर व्हिडीओ शेअर केला. यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून यावर जोरदार टीका केली जात आहे. असं असतानाच आता आनंद आश्रमात पैशांची उधळण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे.

काय आहे नेमकं पत्रात ?

प्रति,

नितीन पाटोळे

१२ सप्टेंबर २०२४ रोजी गणपती विसर्जनाच्या रात्री आपल्याकडून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडले, ते अतिशय निंदनीय असून त्यामुळे आपल्या पक्षावर चौफेर बाजूने टीका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढून टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकाराबद्दल दोन दिवसात खुलासा करावा.

आपला स्नेहांकीत नरेश गणपत म्हस्के

ठाकरे गटाकडून जोरदार टीका  

आनंद दिघे यांचं वास्तव्य असलेल्या आनंद आश्रमामध्ये दिघे यांच्या फोटोसमोर पैशांची उधळण करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत यावर भाष्य केले. ते म्हणाले, “विचलित करणारा तो व्हिडिओ आहे. पवित्र वास्तूत सगळ्यांनी पाहिला तो व्हिडीओ. भ्रष्टाचार आणि लुटीतून आलेला पैसे तिथे उधळला गेला. पूर्वीचा आनंद आश्रम आता राहिलाय का ? लुटीचा पैसा तिथे ठेवला जातोय. दिघे असते तर भिंतीवर असलेला हंटर काढून त्यांना दाखविले असते. आनंद दिघे यांचा हा वारसा नाही. त्यांनी याचे समर्थन कधीच केले नसते. बार मध्ये पैसे उधळतात तसे पैसे उधळले गेले. राज्याला कलंक लावला, गुरुची अपकृती केली. त्यांचे चेले पैसे उधळत होते. धिंगाणा सुरू होता,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसविणे बंधनकारक, परिवहन विभागाचे आवाहन

ठाकरे गटाला शिंदे गटाकडून पुन्हा मोठा धक्का; धाराशिवचा हा नेता करणार शिंदे गटात प्रवेश

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss