शिवसेना-भाजपा पक्षाच्या दहीहंड्यांमुळे डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत ‘हे’ बदल

डोंबिवली वाहतूक विभागाने (Dombivli Traffic Division) ही रस्ते बदलाची अधिसूचना सोमवारी (Monday) जाहीर केली.

शिवसेना-भाजपा पक्षाच्या दहीहंड्यांमुळे डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत ‘हे’ बदल

शिवसेना (Shiv Sena), भाजपा (BJP) पक्षाच्या डोंबिवली (Dombivli) पूर्व, पश्चिम भागातील दहीहंडी कार्यक्रमांमुळे (Dahihandi events) डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौक (Bajiprabhu Chowk), पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील (Pandit Dindayal Road) वाहतुकीत ०६ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० ते ०७ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. डोंबिवली वाहतूक विभागाने (Dombivli Traffic Division) ही रस्ते बदलाची अधिसूचना सोमवारी (Monday) जाहीर केली.

डोंबिवली पूर्वेत भाजपातर्फे (BJP) बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमासाठी ०६ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजल्यापासून ते ०७ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फडके रस्त्यावरुन बाजीप्रभू चौक येथे येणारी वाहतूक बंद करण्यात येत आहे. ही वाहतूक फडके रस्त्यावरुन डावे वळण घेऊन फत्तेह अली रस्त्यावरुन (Fateh Ali Road) पालिका डोंबिवली विभागीय कार्यालय (Municipal Dombivli Divisional Office) येथून वळविण्यात आली आहे.

डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावर सम्राट चौक येथे माजी सभापती दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे (Dipesh Mhatre Foundation) दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागातून मोठागाव, जुनी डोंबिवली, रेतीबंदर, देवीचापाडा भागात जाणारी वाहतूक दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिरासमोर डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, एलोरा सोसायटीमार्गे सम्राट चौकाच्या पाठीमागील बाजूने इच्छितस्थळी जातील. दिनदयाळ रस्त्याने जाण्यासाठी ठाकूरवाडी, रेतीबंदर, देवीचापाडा, उमेशनगर, आनंदनगर भागातून येणाऱ्या वाहनांना हाॅटेल सम्राट चौक येथे रस्ता बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौक येथे डावे वळण घेऊन नाना शंकर शेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील, असे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते (Umesh Gitte) यांनी सांगितले.

हे ही वाचा: 

World Cup 2023, टीम इंडियाच्या ‘या’ १५ खेळाडूंची झाली निवड…

Asia Cup 2023 IND vs Pak, भारत आणि पाकिस्तानच्या ‘सुपर-४’ सामन्यात पुन्हा पाऊस आला तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version