spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘घालीन लोटांगण वंदिन चरण’ Uddhav Thackeray यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर ठाण्यात लागले बॅनर

ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे 'घालीन लोटांगण' या आशयाचे व्यंगचित्र असलेले बॅनर लागल्याचे दिसत आहेत. या बॅनरमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला असून दोन्ही शिवसेनांमध्ये बॅनर वॉर रंगल्याची चर्चा चालू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात धुमधाम सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज (शनिवार, १० ऑगस्ट) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दिल्लीनंतर आता ठाण्यात धडकणार आहेत. आपल्या भाषणातून आक्रमक भूमिका मांडणारे व विरोधकांवर सडकून टीका करणारे उद्धव ठाकरे यांची मुलुखमैदान तोफ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार आहे. या शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांचे संबोधन करणार आहेत. अश्यातच, आता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे ‘घालीन लोटांगण’ या आशयाचे व्यंगचित्र असलेले बॅनर लागल्याचे दिसत आहेत. या बॅनरमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला असून दोन्ही शिवसेनांमध्ये बॅनर वॉर रंगल्याची चर्चा चालू आहे.

एकीकडे काल ( शुक्रवार, ९ ऑगस्ट) उद्धव ठाकरे गटाकडून कोणी पक्ष चोरला असे बॅनर लावले असताना आज कुठल्याही प्रकारचा नाव किंवा कुठल्याही प्रकारच्या पुरावा न ठेवता ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे घालीन लोटांगण असे बॅनर लागल्याचे दिसत आहेत विशेष म्हणजे हे दोन्ही बॅनर एकाच रस्त्यावर आणि समांतर रेषेत आहेत जेणेकरून नागरिकांची नजर एका बॅनरवर पडली तर दुसऱ्या बॅनर्स सुद्धा पडली पाहिजे. या मुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असून आता शिवसेना उबाठा गट यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावे लागणार आहे.

शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, उपनेत्या सुषमा अंधारे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीत ठाकरे गटाचा पराभव करत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे हे त्यांच्याच शिवसेनेचे असल्याचे स्पष्ट केले होते. या निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला असून त्यांनी या पराभवाचा बदला विधानसभा निवडणुकीत घेण्याचा चंग बांधला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मोर्चेबांधणी करत निवडणुकीची रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे.

 

Pune Zika Virus : पुणे शहरात आतापर्यंत झिकाचे ६६ रुग्ण, अनेकांना झिकाचा संसर्ग

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss