ठाकरे कुटुंबीय ठाण्यात, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दोन गटातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहेत. असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

ठाकरे कुटुंबीय ठाण्यात, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात दोन गटातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहेत. असाच एक वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काल दिनांक ३ एप्रिल रोजी रात्री ठाण्यात पुन्हा एकदा वाद झाला आहे. ठाण्यातील युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. तसेच आज तिला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आज दुपारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि सौ रश्मी ठाकरे हे स्वतः ठाण्यात येत आहेत.

काल ठाण्यात जोरदार मारहाण झाली. या मारहाणीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटाकडून जोरदार मारहाण करण्यात आली आहे असा आरोप सध्या केला जात आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे असे त्या महिलेचं नाव आहे. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत संजय राऊत यांनी राज्यात कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल केला आहे.

तर आज या पार्श्वभूमीवर मारहाणीत जखमी रोशनी शिंदे यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची इंत्यंभूत माहिती घेण्यात आली.

हे ही वाचा : 

First Solar Eclipse of 2023 in India, जाणून घ्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण कधी आहे

अरुणाचलच्या ११ ठिकाणांना चीनने दिली नवी नावे, परराष्ट्र मंत्रालय संतापले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version