spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uran Murder Case: आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी!

उरण हत्याप्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी दाऊद शेखला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी दाऊद शेखला अटक केल्यानंतर आज (बुधवार, ३१ जुलै) सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीसह त्याच्यावर विविध कलमांअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यशश्री शिंदे हिच्या हत्येनंतर फरार झालेल्या दाऊद शेखला नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधून सापळा सापळा रचून अटक केली होती. त्यानंतर त्याला आज पनवेल सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर एससी, एसटी कायद्यांमधील अत्याचार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजते.

उरण येथील यशश्री शिंदे हत्याप्रकरणानंतर (Uran Murder Case) राज्यभरात खळबळ उडाली असून नागरिकांनी महिला सुरक्षेवरून संताप व्यक्त केला आहे. २५ जुलै रोजी बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह पनवेल रेल्वे स्थानकाजवळ झाडीत आढळला. आरोपी दाऊद शेख याने हि हत्या केल्यावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे. अश्यातच, हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीला हत्येच्या पाच दिवसांनंतर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटक राज्यातून आरोपी दाऊद शेख याला अटक केली आहे. आता सत्र न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास चालू आहे.

दाऊदने दिली हत्येची कबुली

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी सुरु केली आता दाऊदने हत्येची कबुली दिली आहे. यामध्ये दाऊद शेख आणि यशश्री एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्याची माहिती मिळत आहे. शालेय जीवनापासून त्यांची मैत्री असल्याची माहिती समोर येत आहे. यशश्री उरणमध्ये जिथे राहायची तिथेच दाऊददेखील वास्तव्यास होता. २०१९ मध्ये यशश्रीच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरोधात तक्रार केली होती. त्यावेळी त्याच्याविरोधात पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा दाऊदला तुरुंगवासही भोगावा लागला होता. जेलवारीनानंतर तो पुन्हा उरणमध्ये परतला. यावेळी दाऊदने यशश्रीला लग्नासाठी मागणी केली होती मात्र यशश्रीने लग्नासाठी नकार दिला. २५ जुलै रोजी यशश्रीला भेटण्यासाठी आला असता दोघांमध्ये वाद झाला आणि यातून दाऊदने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

Uran Murder Case: ‘तुमची दहशत दाखवा’, Sharmila Thackeray यांचे पोलिसांना आवाहन, Navi Mumbai Police आयुक्तांची घेतली भेट

दंगली घडवायला काही राजकारणी कारणीभूत; Sharad Pawar यांच्या वक्तव्यावर Ravikant Tupkar यांची प्रतिक्रिया चर्चेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss