spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१५ तारखेपासून ठाण्यातील भाजी विक्रेते बेमुदत संपावर

Thane Vegetable Market : ठाण्यातील जांभळी नाका परिसरात मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ भाजी मंडई अस्तित्वात आहे. ठाणे शहर व आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या भाजी मंडईत भाजी खरेदी करायला येत असतात.

Thane Vegetable Market : ठाण्यातील जांभळी नाका परिसरात मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ भाजी मंडई अस्तित्वात आहे. ठाणे शहर व आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या भाजी मंडईत भाजी खरेदी करायला येत असतात. शेतकऱ्याचा ताजा शेतमाल सरळ ठाण्याच्या भाजी मंडईत येत असल्याने ठाणेकर ग्राहक याचं भाजी मंडईतून भाजी खरेदी करणं पसंत करत असतात. परंतु या भाजी मंडईच्या परिसरात अनधिकृत भाजीवाल्याचे प्रमाण वाढल्याने भाजी मंडईत येणाऱ्या ग्राहकांनी मंडईत येण्यापासून आपली पाठ फिरवली आहे. अनधिकृत भाजी विक्रेते रस्त्यावर ठिय्या मांडून बसल्याने ग्राहक तेथूनच भाजी खरेदी करून पुढे निघून जातात त्यामुळे भाजी मंडईत बसलेल्या भाजी विक्रेत्यांचे नुकसान होतं आहे. या समस्येमुळे त्रस्त असलेल्या भाजी विक्रेत्यांसोबत टाईम महाराष्ट्रने बातचीत केली आहे व या विक्रेत्यांच्या अडी अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

छत्रपती शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघांचे उपाध्यक्ष जय दिलीप चोणकर यांना या समस्येबाबत विचारे असता, लॉकडाउन पासून आम्ही प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न करतोय पण प्रशासन जाग होतं नसल्याच त्यांनी सांगितलं आहे. चिरीमिरीसाठी आमच्या भाजी मंडईला अनधिकृत भाजीवाल्यांनी, फळवाल्यांनी वेडा घातला आहे. त्याच्यामुळे आमच्या पोटापाण्यावरती गदा आलेली आहे. या विरुद्ध आम्ही पोलीस आयुक्तांना, ठाणे महानगरपालिका आयुक्तांना भेटून त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून आम्ही आमचा त्रास त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही आम्हाला न्याय मिळाला नाही या त्रासाला कंटाळून आम्ही पंधरा तारखेपासून बेमुदत बंद पुकारतो आहोत. आमच्या या त्रासाला पूर्णतः प्रशासन जबाबदार असेल असं चोणकर यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितला आहे.

सोबतचं जिजामाता फळभाजी सेवा संघाशी टाईम महाराष्ट्राने संवाद साधला असता येथील व्यापाऱ्यांनी आपली व्यथा टाईम महाराष्ट्रसमोर मांडली आहे. सुभाष ठोंबरे या विक्रेत्यांनी पोलीस प्रशासन व ठाणे पालिका प्रशासनाच्या बेबंदशाहीमुळे अनधिकृत फेरीवाल्याची समस्या वाढल्याच म्हंटल आहे. प्रशासनाचे आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर आम्ही आमच्या बेमुदत बंदावर ठाम राहू असं विक्रेते सुभाष ठोंबरे यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितलं आहे. विक्रेत्यांच्या या बेमुदत बंदमुळे प्रशासन खडबडून जागे होईल का? मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ ठाणे शहरात भाजी विक्री करणारा अधिकृत विक्रेत्यांना न्याय मिळेल का? हेही पानं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करायला येणाऱ्या अनुयायांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईच्या वाहतुकीत पुढील बदल

आमचा ठाकरें गटाच्या शिवसैनिकांवर राग नाही – प्रवक्ते नरेश म्हस्के

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss