Thursday, July 4, 2024

Latest Posts

VERSOVA JCB ACCIDENT: मृत मजुराच्या कुटूंबाला CM EKNATH SHINDE यांच्याहस्ते ५० लाखांची मदत

फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत (Versova JCB Accident) जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत (Versova JCB Accident) जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्याना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए (MMRDA) आणि एल अँड टीचे (L&T) वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे 50 लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर याठिकाणी सैन्यदल (Indian Army), तटरक्षक दल (Coast Guards), एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफच्या (SDRF) जवानांना एकत्रितपणे मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र वरून कोसळणारा पाऊस आणि त्यात सुरू असलेल्या बचावकार्यामुळे त्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून हा मदतनिधी आज त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.

यावेळी एमएमआरडीएचे सहआयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर हेदेखील यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा

आरक्षणाचा मुद्दा पेटला पण “दादा” गेले कुणीकडे ? Ajit pawar झाले नॉटरिचेबल

शिक्षकांवर शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde गंभीर यांच्यावर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss