नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता जर तुम्हाला तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घ्यायचे असेल आता तुम्हाला आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला हे दर्शन महाराष्ट्रातच करता येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आता जर तुम्हाला तिरुपती बालाजीचे (Tirupati Balaji) दर्शन घ्यायचे असेल आता तुम्हाला आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला हे दर्शन महाराष्ट्रातच करता येणार आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

नवी मुंबई परिसरातील उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. आज सकाळी पहाटे ६.४५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलवेनोड येथील प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिरुपती तिरुमला संस्थानचे मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. विधीवत पूजा अर्चा करत या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती.

आजच्या दिवसातील विशेष बाब म्हणजे भल्या पहाटे या मंदिराचं भूमिजपून करण्यात आलेलं असतानाही मोठ्या प्रमाणत गर्दी होती. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तिरुपती तिरुमाला बालाजी संस्थानच्या वतीने हे मंदिर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच या मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज भूमिपूजन सोहळा पार पडला. तसेच यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, आता प्रत्येकाला या ठिकाणी बालाजीचं दर्शन घेता येईल. आजचा हा दिवस आनंदाचा आहे.नवी मुंबई आणि महाराष्ट्रात समृद्धी, सुख शांती आणि सर्वांना आशीर्वाद तिरुपती बालाजीचे लाभतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या सरकारच्या माध्यमातून सर्व सहकार्य करु,असं एकनाथ शिंदे म्हणाले. चांगलं काम व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत. तुम्ही महाराष्ट्रात मंदिर बनवण्याचा संकल्प केला हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अनेक लोकांची इच्छा तिरुपती बालाजीला पोहोचायची इच्छा असते. आज तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टनं संकल्प केला आहे त्यामुळं त्यांना धन्यवाद दिलेले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

तसेच तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर नवी मुंबईत श्री व्यंकटेश मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये हे मंदिर उभारलं जात आहे. तर देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यानं नवी मुंबईतील उलवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली आहे. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा:

Marine Line जवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या

आजचे राशिभविष्य, ०७ जुन २०२३, आरोग्याच्या तक्रारीमुळे एका महत्त्वाच्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version