त्याला विचारायची गरज काय? तू तुझ्या पक्षाचं बघ, Kapil Patil यांच्याकडून बाळ्या मामांचा एकेरी उल्लेख

त्याला विचारायची गरज काय? तू तुझ्या पक्षाचं बघ, Kapil Patil यांच्याकडून बाळ्या मामांचा एकेरी उल्लेख

माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी कल्याण (Kalyan) येथे माध्यमांशी संवाद साधत खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांचा एकेरी उल्लेख करत रोखठोक टीका केली. त्याला विचारायची गरज काय? तुझ्या पक्षाचं बघ. माझ्या पक्षाची तिकीटं वाटू नको. लोकांनी सेवा विकास करण्याची संधी दिली आहे. विकास करायचा विचार करा. कपिल पाटील यांचं नाव घेण्याशिवाय यांना टीआरपी मिळत नाही. माझी हिंमत कुणाला बघायची गरज नाही. माझ्यामध्ये प्रचंड क्षमता आणि ताकद आहे. मी कुणाच्या भरवशावर निवडणूक लढवत नाही. मला पक्षाने सांगितलं लढा तर मी लढणार, मला काय याची परवानगी पाहिजे का? असा सवाल कपिल पाटील (Kapil Patil) यांनी उपस्थित केला आहे. आम्ही हार पचवून ५ जूनपासून कामाला लागलो पण यांना विजय पचवता आलेला नसल्याचा घणाघात कपिल पाटील यांनी सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांच्यावर केला.

काही दिवसांपूर्वी स्थानिक मीडियासोबत बोलताना कपिल पाटलांना प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही मुरबाड विधानसभा (Murbad Vidhansabha) लढवणार का? यावर कपिल पाटील (Kapil Patil) यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत उत्तर दिलं की, कार्यकर्त्यांची इच्छा असेल आणि पक्षांनी जर संधी दिली तर नक्कीच मुरबाड विधानसभा लढवणार, आणि पक्षाने जर दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार. पुढे ते म्हणाले की, आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो निर्णय असेल तो आम्हां सर्व सहकाऱ्यांना बांधील असेल. 

या सर्व चर्चेवर भिवंडीचे (Bhiwandi) नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. बाळ्या मामा म्हणाले की, कपिल पाटलांना चॅलेंज आहे की, त्यांनी मुरबाड (Murbad) मधून उभं राहून दाखवावं. पुढे ते म्हणाले की, त्यांना लोकसभेला देखील अशाच प्रकारे चॅलेंज दिलं होतं आणि तिथे सुद्धा त्यांचा पराभव झाला होता. नागरिकांनी स्पष्टपणे कपिल पाटलांना नाकारलं आहे, असं बाळ्या मामा यांनी सांगितलं. पुढे बोलताना बाळ्या मामा म्हात्रे (Balya Mama Mhatre) म्हणाले की, इतक्या वर्ष कपिल पाटील सत्तेत होते मग इतक्या वर्षात त्यांनी काय केलं? असा सवाल बाळ्या मामा यांनी केला. आता कपिल पाटलांनी मुरबाड विधानसभेसाठी उभं राहावं, असं खुलं आव्हान बाळ्या मामांनी दिलं आहे. या सर्वांचा विचार केला तर कपिल पाटील मुरबाड किंवा कल्याण पश्चिममधून उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच, कपिल पाटलांनी केलेल्या आरोपावर बाळ्या मामा उत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हे ही वाचा:

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग, नागरिकांचे प्रचंड हाल

निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नकली वाघनखांचे प्रदर्शन: Nana Patole

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version