डोंबिवलीतील गुडीपाडव्याच्या स्वागतयात्रेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार का?

गुडीपाडव्याच्या निमित्त नववर्ष स्वागतयात्रेची पायाभरणी करणाऱ्या डोंबिवलीत हे यंदा २५ वे नववर्ष आहे.

डोंबिवलीतील गुडीपाडव्याच्या स्वागतयात्रेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार का?

गुडीपाडव्याच्या निमित्त नववर्ष स्वागतयात्रेची पायाभरणी करणाऱ्या डोंबिवलीत हे यंदा २५ वे नववर्ष आहे. डोंबिवलीच्या स्वागत यात्रेमध्ये यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही (Dr. Shrikant Shinde) सहभागी होणार आहेत. ही माहिती स्वागत यात्रेचे प्रमुख संयोजक (Dattaram Monde) यांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जगभरात चर्चिल्या जाणाऱ्या भारताच्या वसुधैव कुटुंबकम्’ संकल्पनेचे प्रतिबिंब इथल्या स्वागतयात्रेत उमटणार आहे. या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

गुडीपाडव्याच्या निमित्ताने १९९९ मध्ये ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्येच नवे तर देशामधील सर्वात पहिली स्वागतयात्रा काढण्याचा मान सांस्कृतिक नगरी डोंबिवलीने मिळवला होता. त्यांनतर अल्पावधीतच डोंबिवलीच्या या स्वागतयात्रेचे अनुकरण ठाणे, मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरांनी करत या स्वागतयात्रेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताकडून राबवण्यात येणाऱ्या वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेची जगभरात चर्चा केली जाते. या स्वागतयात्रेमधे श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामध्ये महिला, युवा आणि त्यानंतर विद्यार्थी असा तीन गटांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेष म्हणजे सोशल मिडियातील यू ट्यूबसाठी रिल आणि शॉर्ट फिल्म स्पर्धा ही आयोजित करण्यात आल्या आहेत यांची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानचे कार्यवाह प्रविण दुधे यांनी सांगितले.

या स्वागत यात्रेच्या निमित्ताने श्रीराम नाम जप यज्ञ, स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा, सामुदायिक गीता – गणपती अथर्वशीर्ष पठण, दिपोत्सव, बहुभाषिक भजन, पाककला स्पर्धा, सांस्कृतिक पथ, स्कूटर रॅली, गीत रामायण, महारांगोळी, श्री प्रभुरामांच्या जीवनावर आधारित नृत्यविष्कारासह छ्त्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त व्याख्यानाचेहीआयोजन करण्यात आले आहे. या बाबतची माहिती श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्ष अलका मुतालिक यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

ईडीच्या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांना भावना झाल्या अनावर

Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? पोलिसांना सापडली औषधे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version