spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच, मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू तर ३ गंभीर जखमी

मुंबई-बंगळुरु महामार्गावरील पुनावळेजवळ आज सकाळी ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. ट्रक आणि माल वाहून नेणाऱ्या टेम्पोची धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे आणि तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघांचे रावेत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. लहान टेम्पोमध्ये मंडप डेकोरेशनचे साहित्य होतं. टेम्पोत चलाकासह तिघं बसले होते. टेम्पो वाकडकडून कामशेतला निघाला होता. पुनावळे परिसरात ट्रकने अचानक बाजू बदलली होती. त्यामुळे ट्रकचा ताबा सुटला आणि ट्रक टेम्पोला जाऊन धडकला. या सगळ्यात मागून भरधाव वेगाने येत असलेली कारही धकडली. यात तिघेही ट्रकच्या केबिनमध्ये अडकले होते. पोलिसांच्या मदतीने तिघांना बाहेर काढलं आहे. शहरात सगळीकडे दिवाळीमुळे उत्साहाचं वातावरण आहे. त्यात पुणे शहरात सकाळीच दोन घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

तसेच काही दिवसांपूर्वी पुण्यातील एमआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला होता. पाच जण गंभीर जखमी झाले होते. एक्सयूव्ही ३०० गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या असलेल्या दुकानाला धडकली आणि गाडी पलटी होऊन दोघांनी जागीच प्राण सोडले होते. रचित मेहता आणि गौरव लालवानी अशी मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावं होती.

सासवड कापूरहोळ रस्त्यावर पहाटे हा अपघात झाला होता. भरधाव वेगाने असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दुकानाला जाऊन धडकली आणि पलटी झाली होती. या अपघातात जखमींमध्ये तीन मुलींचा समावेश होता. अपघातानंतर गावकऱ्यांनी मदत करुन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोन जणांना मृत घोषित केलं तर पाच जणांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं. अपघात झालेले विद्यार्थी हे पुण्यातील एमआयटी कॉलेजचे होते आणि ते विविध विभागात शिकत होते.

 

हे ही वाचा:

Mumbai Police : मुंबईत १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू, पोलिसांची नवी मार्गदर्शक सूचना जारी

कृष्णा-अर्जुन जिहादच्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणतात- ‘मी फक्त हे विचारले’

Sanjay Shirsat : आमदार संजय शिरसाट सुखरूप घरी परतले, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss