Thursday, July 4, 2024

Latest Posts

साधू मारहाण प्रकरणातील आरोपींना आज करणार न्यायालयात हजर

पंढरपूर (Pandharpur) येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना (monk) सांगली जिल्ह्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मुल चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती. चार चाकी गाडीतून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची दखल पोलीसांनी घेतली असून याप्रकरणी २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेऊन ७ लोकांना अटक करण्यात आली आहे. या पैकी ७ आरोपींना आज जत न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कोरोना पुन्हा आला, गेल्या २४ तासांत देशात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

मारहाण झालेले चार ही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते. येथे चार चाकी गाडीतून आले यावेळी पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता एका विद्यार्थ्याला विचारला यातून गावात पोरे चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली. त्यात चारही साधूंना जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले होते. घटनास्थळी पोलीस तातडीने दाखल झाले होते आणि त्यांनी साधूंना औषधोपचार देखील केले. मात्र, तक्रार देण्याच्या मानसिकतेमध्ये साधू नव्हते. त्यामुळे ते तिथून निघून गेले.

 या घटनेनंतर सगळीकडून पोलिसांना तक्रारीची नोंद का केली नाही असा प्रश्न विचारण्यात आला. काही साधू संघटनांनी याचा विरोध सुद्धा केला. यावर भाजप महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी म्हटले कि हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे, माझं बोलणं पोलिसांशी झालं आहे आणि त्यांनी त्वरित गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेणार आहेत. काही वेळात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आज त्यापैकी ७ अटक झालेल्या आरोपींना जत न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे ही वाचा:

खार येथील धर्मा ऑफिसमध्ये अयान मुखर्जीसोबत रणबीर आणि आलिया

सिद्धार्थ निगमच्या वाढदिवसाच्या पार्टीत शहनाज गिल एका वेगळ्या अंदाजात

पुण्यात राष्ट्रवादीकडून आज लॉलीपॉप आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss