श्री सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन रूप आले समोर

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिर राज्यासह देशात प्रसिध्द आहे. नाशिकजवळील वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे.

श्री सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन रूप आले समोर

गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिर राज्यासह देशात प्रसिध्द आहे. नाशिकजवळील वणी येथील गडावर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या संवर्धनाचे कामकाज २१ जुलैपासून सुरू असून, त्यात श्री सप्तशृंगी देवीची अतिप्राचीन व स्वयंभू स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे. गुरुवारी भाविकांना या मूर्तीची मोहिनी पडल्याचे दिसून आले.

सप्तशृंगी देवीची (Saptshrungi Devi) मूर्ती संवर्धन व देखभाल कामकाजामुळे दीड महिना मंदिर (Saptshrungi Devi Mandir) बंद ठेवण्यात आले होते. त्या अनुषंगाने मूर्ती संवर्धन व देखभालीचे काम पूर्ण झाले असून भगवतीच्या मूळ रूपाचे सर्वांना दर्शन होत आहे. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप पहिल्यांदाच भाविकांसमोर आले आहे. भगवतीचे मूर्ती संवर्धन आणि देखभाल करण्यासाठी मागील ४५ दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद असून मूर्ती संवर्धनाचे काम पूर्ण झाले आहे. अशातच देवीच्या मूर्तीचे काही फोटो समोर आले आहेत. एकूणच मूर्तीचा झालेला कायापालट सर्वांनाच आश्चर्य करत आहे.

तेजोमय, प्रफुल्लित स्वयंभू मूळ मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी पार पडला. या तीनदिवसीय सोहळ्याच्या सांगतेनंतर मंदिर एक दिवसासाठी स्थानिक ग्रामस्थ, भाविक यांच्यासाठी खुले करण्यात आले होते. देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आला. त्यासाठी कुठलीही रासायनिक प्रक्रिया करण्यात आली नाही. मूर्तीचा धुळीपासून बचाव व्हावा यासाठी अन्य काम आठवडाभर बंद ठेवले गेले. शेंदूर कवच उतरविले जाताना मूर्तीचे स्वयंभू रूप पुढे येत गेले. मूर्तीच्या वरच्या भागासह खालील भागातील हत्ती व अन्य कोरीव शिल्पे नजरेत येताच त्यांची योग्य रीतीने डागडुजी करण्यात आली.

नाशिकच्या (Nashik) सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने भाविकांसह मंदिर प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यानंतर मंदिर देखभालीसाठी तसेच देवी मूर्तीच्या संवर्धनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मूर्ती संवर्धन प्रक्रिया केल्यानंतर भगवतीला स्वरूपावरील मागील क्रित्येक वर्षांपासून साचलेला शेंदूर लेपणाचा भाग धार्मिक व शास्त्रोक्त पद्धतीने काढण्यात आला आहे. त्यानंतर सहा ते आठ सप्टेंबर दरम्यान धार्मिक पूजा हवन विधीचे आयोजन केल्यानंतर आता पितृपक्षात सर्व भक्तांच्या कल्याणासाठी सोळाशे देवी अथर्वशीर्ष पठण अनुष्ठान होत आहे. तर यंदाच्या घटस्थापनेला म्हणजेच पहिल्या माळेला देवीचे मूळ रूप दर्शनासाठी खुले होणार आहे. त्यामुळे घटस्थापनेला सप्तशृंगी मातेच्या मूळ रूपाचं दर्शन सर्व भाविकांना घेता येणार आहे. त्यासाठी भाविकांनी व्यवस्थापनास योग्य सहकार्य करावे असे आवाहन विश्वास त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत शेंदुर लेपन काढल्यानंतर भगवतीची मूर्ती जवळपास दहा फुटी उंच आठ फूट रुंद आकारात व एकूण १८ हातात भिन्न प्रकारातील अस्र व शस्त्र असून त्यात उजव्या हातात खालील बाजूकडून वरून बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडक, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशु तर डाव्या हातात खालून बाजू कडून वरील बाजूकडे कमांडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड, शक्ती, पाच घंटा आहे. ही शस्त्र-अस्त्र विविध देवदेवतांची प्रतीके असल्याची म्हटले जाते. श्री भगवतीची मूर्ती अति प्राचीन व विश्वातील एकमेव भव्य आकार व प्रकारातील ती एकमेव स्वयंभू मूर्ती आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने झळकणार आता मोठ्या पडद्यावर

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही मशीद वादा प्रकरणी न्यायालयात ११ याचिका प्रलंबित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version