spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडेंचा मृतदेह अखेर सापडला !

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहन यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता झाले होते.

महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे (Shashikant Ghorpade) यांचा गेले दोन दिवस NDRF टीम आणि स्थानिक गिर्यारोहन यांची टीम शोध घेत होती. अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता झाले होते. सीसीटीव्ही (CCTV) फुटेजनुसार शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

शशिकांत घोरपडे हे गुरुवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी पुण्याहून साताऱ्याकडे निघाले होते. मात्र ते घरी आलेच नाहीत. दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. अखेर या तपासासाठी सीसीटीव्हीची मदत झाली. आज सकाळपासून नीरा नदीपात्रात त्यांचा शोध सुरु होता. सीसीटीव्हीनुसार, पुणे ते सातारा मार्गात सारोळा गावाजवळ त्यांनी गाडी थांबवली. तिथून पुढे ते नीरा नदीच्या दिशेने चालत गेले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजनुसार तसेच त्यांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन यावरून पोलिसांचा तपास सुरु होता. सारोळे येथील नीरा नदीच्या पुलाशेजारी त्यांची कार आढळली. त्यानुसार कालपासून NDRF आणि स्थानिक रेस्क्यू टीम यांच्याकडून शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु होता.

शशिकांत घोरपडे हे मूळचे साताऱ्याचे आहेत. साताऱ्यातल्या शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कालपासून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरु होता. अखेर आज दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या जवानांना यश आलं. प्रथमदर्शनी तरी शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केल्याचं दिसून येतंय. मात्र यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हे ही वाचा :

Andheri By Poll Election 2022 : “…पक्षाचं नाव बदलून ‘रडकी सेना’ असं ठेवावं” आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Andheri By Poll Election 2022 : अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच – चंद्रशेखर बावनकुळे

Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss