जेवणाच्या ऑर्डरवरून वाद पेटला, हॉटेलच्या शेफने केली वेटरची हत्या

जेवणाच्या ऑर्डरवरून वाद पेटला, हॉटेलच्या शेफने केली वेटरची हत्या

मुंबई : मुंबईमधील अंधेरी पूर्व या भागातील थ्री स्टार हॉटेलमध्ये एका शेफ हातातून वेटरचा खून झाल्याची घटना घडली आहे. जेवणाची ऑर्डर बदलली आणि या शिल्लक कारणावरून शेफ आणि वेटर मध्ये वाद झाला. याचा बदला म्हणून शेफ ने वेटरची हत्या केली असे समोर आले. तर जगदीश जलाल असे या मृत वेटरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शेफ आणि वेटर मध्ये हाणामारी झाली होती. मात्र, त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी हा वाद मिटवला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी आज सकाळी पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी चिडलेल्या वेटरवर चाकूने वार केले त्यात जागीच वेटरचा मृत्यू झाला येते. काम करायला लागल्यापासून पहिल्यांदा तशी घटना घडल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

जगदीश जलाल यांच्यावर चाकूने वार केल्यानंतर आरोपी माधव हा हॉटेल मध्ये थांबून पोलिसांच्या स्वाधीन झाला पोलीस अधिकारी  व्ही.नारायण यांच्या अहवालानुसार सकाळी साडे आठच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा : 

“पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय?”  शरद पवारांनी मांडले आपले परखड मत

Exit mobile version