अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री करणार पाहणी

नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अमाप नुकसान झाले आहे. मागील महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती आणि शेतकरार्थी संकटात सापडला आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मुख्यमंत्री करणार पाहणी

नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अमाप नुकसान झाले आहे. मागील महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती आणि शेतकरार्थी संकटात सापडला आहे. अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिक जिल्यामध्ये पाहणीसाठी येत आहेत. नाशिकमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने रविवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. नाशिक तालुक्यासह अनेक जिल्यातील सटाणा (Satana), देवळा, नांदगाव, सिन्नर या तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे गारांच्या वर्षांवासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अशातच अनेक भागांमध्ये शेतकरी संताप व्यक्त करत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. नाशिकमधील अनेक भागांमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधांवर जाऊन पाहणी करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर होते. अशातच काळ राज्यामधील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महिन्याभरामध्ये तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला तर झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

नांदगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अगोदर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. या दरम्यान दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यात जिल्यामधील चांदवड, देवळा, बागलाण सटाणा शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे. या भागामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करणार आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यानंतर शिंदे लागलीच शेतकऱ्यांच्या बांधावर येत असून शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

५६ वर्ष ज्या घराण्यामध्ये तुम्ही जन्माला आले ते घर टिकवू शकले नाही, नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Exclusive : भाजपाला पोहोचायचं राज्यातल्या ३ कोटी कुटुंबात

Armaan Malik ने दिली खुशखबर, दुसरी पत्नी Kritika Malik बनली आई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version