The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून हजारो गरजू रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणारे खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या संवेदनशील सामाजिक कार्याबद्दल ‘लीडरशीप फॅार सोशल चेंज ॲवार्ड’ हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

The CSR Journal चा प्रतिष्ठेचा ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना बहाल..!

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून हजारो गरजू रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणारे खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या संवेदनशील सामाजिक कार्याबद्दल ‘लीडरशीप फॅार सोशल चेंज ॲवार्ड’ हा राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘The CSR Journal’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘द CSR Journal एक्सलन्स अवॉर्ड २०२२’ पुरस्कार सोहळ्यात डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाजकार्याची दखल घेत ‘लीडरशीप फॉर सोशल चेंज अवॉर्ड’ या पुरस्काराने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना सन्मानित करण्यात आले, ही अभिमानाची बाब आहे..

वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र काम करणारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रात लाखो रूग्णांना मायेचा आधार ठरत आहे. तसेच सांस्कृतिक, ऐतिहासिक, पर्यावरण, सामाजिक, राजकीय क्षेत्रात अभूतपूर्व आणि वेगळेपणा जपणारे काम तसेच देशातील युवकांना एक पथदर्शक काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत आहेत. देशाच भविष्य अश्या दमदार युवकांमुळे उज्ज्वल आहे, अश्या भावना सीएसआर जर्नलने हा पुरस्कार देताना प्रसिद्ध जर्नलने व्यक्त केल्या.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या राष्ट्रीय पुरस्काराने खासदार डॅा. श्रीकांत शिंदे यांना वांद्र्यात एका शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी समाजातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक क्षेत्रातील प्रतिष्ठित उपस्थित होते.

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना घातल्या तीन अटी

दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा, शिवसैनिकांचा पैसा त्यांना मिळाला पाहिजे…

देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version