वाद जुना पण कारण नवीन : मित्राने केली मित्राची हत्या

वाद जुना पण कारण नवीन : मित्राने केली मित्राची हत्या

मुंबईतीळ शाहूनगर मध्ये २८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय या प्रकरणी शाहूनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. रोनीथ भालेराव असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर रुपेश सावदे   (वय ३२), मनीष राठोड ( २७ ) आणि सागर साळवे ( २८ ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना रविवारी पहाटे आश्रय बारजवळ घडली आहे. किरकोळ कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

रोनीथ भालेराव हा त्याच्या दोन मित्रांसोबत मद्यपान करत होता .रात्री उशिरा हे सर्व जण आणखी काही मद्य घेण्याचे ठरवून आश्रय बारजवळ आले. तेथे रोनीथ हा मित्र रुपेशकडे रागाने पाहतो यातून दोनी मित्रांमध्ये म्हणजेच वाद झाला. थोड्याच वेळात वादाचे रूपांतर मारहाणीत झाले रुपेशने रोनीथला मारहाण करायला सुरवात केली. यामध्ये राठोड आणि साळवे हे देखील रोनीथला मारण्यासाठी रुपेशची सहाय्यता करू लागले. या घटनेनंतर रोनीथचा मृत्यू झाला.
रोनीथच्या हत्येप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भालेराव आणि मनीष राठोर हे एकाच परिसरात रहात असून दोघांमध्ये पूर्वीपासूनच वाद होता. यादरम्यान रविवारी दुपारी रोनित रागाणे बघत असल्याचे कारण देत तिघांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत रोनितचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी तीनही आरोपींवर ३०२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातूनच रोनितचा जीव घेतला.
बेदम मारहाण झाल्याने रोनित गर्भगळीत झाला आणि तो जागेवरच कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा :

भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे नवे पंतप्रधान

IND vs PAK: ऋषभ पंतला पाहून चाहत्यांनी ‘उर्वशी-उर्वशी’ ओरडत गोंधळ घातला, पाहा हा व्हिडिओ

हुसंख्य पक्षाच्या खासदारांनी यूकेच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांना दिला होकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version