Saptashrungi Mandir : आजपासून ते १३ नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे दार भाविकांसाठी २४ तास खुलं

Saptashrungi Mandir : आजपासून ते १३ नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे दार भाविकांसाठी २४ तास खुलं

नवरात्रीनंतर आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड येथे सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता हे मंदिर २४ तास भाविकांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज २७ ऑक्टोबर पासून ते रविवार १३ नोव्हेंबर पर्यंत सप्तश्रृंगी मातेचं मंदिरं २४ तास खुलं राहणार आहे. यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. दिवाळी सण, शाळा-कॉलेजला असलेल्या सुट्ट्या आणि यंदा २ वर्षांनंतर साजरी होणारी निर्बंधमुक्त वातावरणामधली दिवाळी यामुळे भाविक मोठे संख्येने गडावर येतील असा अंदाज आहे. या काळात गडावर गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना २४ तास दर्शनाची सोय आता खुली असणार आहेत.

हेही वाचा : 

IND vs NED: T20 फॉरमॅटमध्ये प्रथमच भारत-नेदरलँड्स आमनेसामने येणार, भारतीयांना आता दुसऱ्या विजयासाठी उत्सुकता

याशिवाय भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना सप्तश्रृंगी देवी दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वत संस्थेने घेतला आहे. दरम्यान आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांना सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

Aditya Thackeray : शिंदे-फडणवीसांआधी ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, आदित्य ठाकरे आज पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार

दरम्यानच्या कालावधीत भाविकांनी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत सप्तशृंगी देवी दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे, त्याप्रमाणे सप्तश्रृंगीचं मंदिर हे नाशिक मध्ये स्थित आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ते एक आहे. भाविकांनी आता २४ तास दर्शन व्यवस्था सुरू राहणार असल्याने त्याचा फायदा घ्यावा. गर्दीच्या वेळेत दर्शन टाळून अन्य उपलब्ध वेळेचाही विचार करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Mumbai Local Train : लोकल सेवा खोळंबली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडमूळे प्रवाशांचे हाल

Exit mobile version