spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला झाली सुरुवात

राज्यात आजपासून दि २ जानेवारीपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे.

राज्यात आजपासून दि २ जानेवारीपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) मैदानी चाचणीला (Physical Efficiency Test) सुरुवात झाली आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात असल्याचं पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे.

अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण ७५ पोलीस शिपाई जागांसाठी ४९०० उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. यासाठी आज सकाळपासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक क्षमता चाचणीला सुरुवात झाली आहे. भावी पोलीस होण्यासाठी हजारो उमेदवार सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे १४ हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. त्यासाठी मागवण्यात आलेल्या ऑनलाईन अर्जांसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणींमुळे १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातून सुमारे १४ हजार जागांसाठी १८ लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. तर २ ते ४ जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर ५ जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. ६ ते १४ जानेवारी २०२३ पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर १५ ते १७ जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

ही कागदपत्रे सोबत आवश्यक –

– उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
– आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
– सर्व मूळ कागदपत्रे
– सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
– अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
– आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र

हे ही वाचा:

रतन टाटा यांचे निकटवर्तीय R. K. Krishna Kumar यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, सूर्यनगरी एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss