spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा बसला आग; पुण्यात शिवशाही बसला भीषण आग

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये बसला आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. पुण्यात आज (मंगळवार) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या अगोदर सकाळी एका हॉटेलला आग लागली होती. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले होते. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.

या आगीत बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा असा हा शास्त्रीनगर परिसर आहे आणि याच परिसरातील रस्त्यावर शिवशाही बसला आग लागली. एम एच ०६ डी डब्ल्यू ०३१७ क्रमांकाची ही शिवशाही बस यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत होती. आज सकाळी येरवाड्यातील शास्त्रीनगर येथील गलांडे हॉस्पिटल जवळ ही बस आली असता तिने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली. तर प्राप्त माहितीनुसार यवतामाळहून निघाल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. मात्र तशा अवस्थेत ती पुण्याला आली. सुदैवाने सर्व प्रवासी खराडी येथे उतरले होते.

गाडी खराब झाल्याने चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील ४२ प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याची माहिती आहे. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती आहे. मागच्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी वणी येथे एसटी महामंडळाच्या एका बसला आग लागली होती. सुदैवाने त्या घटनेत जिवितहानी झाली नाही. तर पुण्यातील या घटनेत चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप आहेत.

हे ही वाचा :

Narendra Dabholkar Birthday : समाजसेवक “नरेंद्र दाभोळकर” यांच्या जयंती निमित्त खास फोटो

अभिनेता सलमान खान सह अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या सुरक्षेत वाढ .

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss