‘शिवसृष्टीच्या’ कामाचा पहिला टप्पा सरकारवाड्याचं काम पूर्ण, अमित शाहा करणार लोकार्पण

‘शिवसृष्टीच्या’ कामाचा पहिला टप्पा सरकारवाड्याचं काम पूर्ण, अमित शाहा करणार  लोकार्पण

कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांनी त्यांच्या हयातीत ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासाबद्दल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. अशा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातील ‘शिवसृष्टी’ (shivsrushti) प्रकल्प पुण्यातील नऱ्हे-आंबेगाव येथे साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थात ‘सरकारवाडा’ हा पूर्ण झाला आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी, शिवजयंतीचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते याचे लोकार्पण होणार आहे.

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. गृहमंत्री अमित शाह हे १९ आणि २० फेब्रुवारी रोजी पुण्यवंत येणार आहेत. यावेळेस शिवजयंतीचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. ‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्पा असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन व बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. शिवाय याच ठिकाणी देवगिरी, तोरणा, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळगड आणि विशाळगड या गड–किल्ल्यांची सफर घडविणारा ‘दुर्गवैभव’ हा भाग, शिव छत्रपतींच्या काळात वापरत असलेल्या शस्त्रांचे विशेष दालन ‘रणांगण’, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती देणारे दालन आणि महाराजांची आग्रा येथून झालेली सुटका ही ऐतिहासिक घटना एका विशेष थिएटरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच मॅड मॅपिंगद्वारे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण ऐकण्याची अनुभुती देखील मिळणार आहे.असा हा अत्याधुनिक प्रकल्प असणार आहे.

‘शिवसृष्टी’ हा प्रकल्प चार टप्प्यात उभारण्यात येणार असून हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च हा ४३८ कोटी रुपये इतका आहे. आतापर्यंत देणगीदारांकडून ६० कोटी रुपये या प्रकल्पाला मिळाले आहेत. पहिल्या टप्प्याच्या उभारणीत करण्यात आला आहे. त्या बरोबरच ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या प्रयोगातून काही निधी देखील उपलब्ध झाला आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या १२ हजारांपेक्षा जास्त व्याख्यानांच्या माध्यमातून जो निधी उभा केला या सगळ्यांच्या मदतीने शिवसृष्टीच्या कार्याला आता उभारण्यात येणार आहे.

हे ही वाचा : 

IND vs WI, भारताच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज एक मोठे आव्हान,वेस्ट इंडिजने घेतला फलंदाजीचा निर्णय

१० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version