maharashtra winter session 2022 हिवाळी अधिवेशनाचा दिवस चौथा, आज सभागृहात ५४ हजार कोटींच्या पुरवण्या मंजूर होणार?

maharashtra winter session 2022 हिवाळी अधिवेशनाचा दिवस चौथा, आज सभागृहात ५४ हजार कोटींच्या पुरवण्या मंजूर होणार?

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा (winter session) आज (२२ डिसेंबर) चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत असल्याचे पाहायला मिळालं, आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे दिसत आहे. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : 

Christmas 2022 ही ५ अल्कोहोलविरहित मॉकटेल पेये वाढवतील तुमच्या ख्रिसमस पार्टीची शान

दरम्यान, विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. एनआयटी (नागपूर सुधार प्रन्यास) भूखंड घोटाळा विधानभवनात (Vidhan Bhavan Nagpur) गाजला. खोके घेऊन भूखंड ओके करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा (CM Eknath Shinde) धिक्कार असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या.. मुख्यमंत्री राजीनामा द्या… अशा घोषणांनी तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला. भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ईडी सरकार हाय हाय, भ्रष्ट सरकार हाय हाय, खोके सरकार हाय हाय, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.

आज हिवाळी अधिवेशनावर एकूण १२ मोर्चे धडकणार असल्याची शक्यता आहे. पोलीस पाटलांच्या संघटनेसह विविध संघटनांचे आज मोर्चे धडकणार सर्व मोर्चे झिरो मैल येथे सर्व मोर्चे अडवले जाणार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

Ravish Kumar यांचा दावा, गौतम अदानी यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म द क्विंटमध्येही आहेत शेअर्स , क्विंटच्या सीईओने दावा नाकारला

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली की, राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमधील २० टक्के जागा महिला चालकांसाठी राखीव ठेवली जाईल. सार्वजनिक पार्किंगच्या (winter session Maharashtra) ठिकाणी त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी गाडी लावताना महिलांना अनेकदा जागेची शोधाशोध करावी लागते. तसेच गाड्या बाजुला सरकवून आपली गाडी लावण्यात मर्यादा येतात. यामुळे महिलांचा सार्वजनिक ठिकाणी गाडी लावतानाचा त्रास कमी होणार आहे. याआधी महिलांसाठी बसमध्ये बसण्यासाठी जागा आरक्षित होती. आता पार्किंगमध्येही महिलांना आरक्षण मिळालं आहे.

Exit mobile version