Wednesday, July 3, 2024

Latest Posts

MNS च्या नेत्यांनी केली मोठी मागणी, ‘या’ महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका!

"डोमेसाईलची अट काढल्यास बांगलादेशी सुद्धा याचा फायदा घेतील. ही योजना चांगलीच आहे. या योजनेला आमचा विरोध नाही. महिलांचे आर्थिकदृष्टया सक्षमीकरण करण्याची गरज आहे या मताशी मी आणि माझे पक्ष नेते याच मताचे आहोत."

पावसाळी अधिवेशन (MONSOON SESSION) गुरुवारपासून सुरु झाले आहे. या पावसाळी अधिवेशनात सरकारने २०२४-२५ अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अनेक योजनाची घोषणा करण्यात आली. आज विधिमंडळ सहावा दिवस आहे. त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प (budget) जाहीर करण्यात आला. हा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २८ जून रोजी सादर केला होता.

यात मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ जुलै २०२४ रोजी सुरु करण्यात आली आहे. आता याच योजनेत काही नवे बदल करण्यात आले आहेत. यात महिलांचे वय आता ६५ वर्ष इतके वाढवण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या अर्ज भरण्याची तारीखसुद्धा वाढवण्यात आली आहे. परंतु हे अर्ज ऑफलाईन मिळत आहेत. हे अर्ज भरून घेण्यासाठी तहसील कार्यालयात शुल्क आकारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एका कुटुंबात २ च व्यक्ती हा अर्ज भटू शकतात. एक विवाहित स्त्री व दुसरी अविवाहित स्त्री. या योजनेमुळे महिलांना बराच दिलासा मिळणार आहे.
या योजनेचा लाभ मुस्लिम समाजातील ज्या महिलांना एका पेक्षा अधिक आपत्य आहेत किंवा ज्या मुसलमानाच्या एकापेक्षा अधिक बायका आहेत अश्या स्त्रियांना याचा लाभ मिळू नये. असे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माध्यमांना सांगितले.
Prakash Mahajan News Photo Prakash Mahajan, brother of ...
प्रकाश महाजन (Prakash Mahajan) नक्की काय म्हणले ?
“सरकार इतरांच्या बायका सांभाळण्यासाठी नाही तर ज्यांना गरज आहे त्या महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण व्हावे, यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली. मात्र सरकारच्या योजनेचा कोणीही चुकीचा फायदा घेतला नाही पाहिजे. विवाहित महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना किती अपत्य आहेत, हे पाहून त्या महिलांना या योजनेचा लाभ द्यावा’ या शिवाय पुरूषाला तीन बायका असतील तर त्या तिघींना सरकार या योजनेचा लाभ देणार का?” असा सवालही प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
“डोमेसाईलची अट काढल्यास बांगलादेशी सुद्धा याचा फायदा घेतील. ही योजना चांगलीच आहे. या योजनेला आमचा विरोध नाही. महिलांचे आर्थिकदृष्टया सक्षमीकरण करण्याची गरज आहे या मताशी मी आणि माझे पक्ष नेते याच मताचे आहोत. परंतु या योजनेचा लाभ गर्जून पर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे”, असे मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.

THE ACADEMY SCHOOL, PUNE (TAS) यांनी केली जागतिक आयआयएमयुएन परिषद आयोजित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss