मुकेश अंबानींना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिसरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

मुकेश अंबानींना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दहिसरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाईनवर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करुन अंबानी कुटुंबाला धमकी दिली होती. अँटिलिया प्रकरणानंतर मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनवर ३ ते ४ वेळा फोन करून धमक्या देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या डी बी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांनी यश आले असून त्याची ओळख पटली आहे.(mumbai police arrested suspect who threatened mukesh ambani)

यासंबंधी तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. त्याच वेळी अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था आणखी जास्त कडक केली. तर, एका पथकाने धमकीच्या फोनचा तपास सुरू केला. दहिसरमधून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव विष्णू भूमीक असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. संशयित आरोपी ५७ वर्षीय असून मानसिक आजारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपी दहिसर पश्चिममधील एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात याआधीदेखील आरोपीविरोधात गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आणि पुढील तपास सुरू केला होता आणि त्यांना या तपासात यश मिळाले.

हे ही वाचा :-

तीन तासात अंबानी कुटुंबीयांचा खात्मा, तब्ब्ल ८ धमकीचे फोन कॉल

Exit mobile version