Saturday, July 6, 2024

Latest Posts

टिळक भवनमध्ये Konkan विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Bunty Patil), प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रशासन व संघटन प्रमोद मोरे (Pramod More), प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा , गजानन देसाई यांच्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, प्रभारी, सहप्रभारी व निवडणुकीचे समन्वयक उपस्थित होते.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रमेश कीर (Ramesh Kir) यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदार संघाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी व्यक्त केला आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर (Tilak Bhavan Dadar) येथे कोकण विभागातील संघटानात्मक १३ जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक प्रदेश कार्याध्यक्ष व कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या समन्वय समितीचे प्रमुख नसीम खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनता भारतीय जनता पक्षाच्या (BJP)  विभाजनकारी व जनविरोधी राजकारणाला कंटाळली आहे. लोकसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचाच विजय होईल त्यासाठी मतादारांशी थेट संपर्क साधा, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करा. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP), समाजवादी पार्टी (Samajvadi Party), शेकाप, आम आदमी पक्षासह (AAP) सर्व समविचारी पक्षांशी योग्य समन्वय साधून काम केल्यास आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही असे नसीम खान म्हणाले.

या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील (Bunty Patil), प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रशासन व संघटन प्रमोद मोरे (Pramod More), प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा , गजानन देसाई यांच्यासह कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, प्रभारी, सहप्रभारी व निवडणुकीचे समन्वयक उपस्थित होते.

हे ही वाचा:

Tata Starbucks व Mcdonald’s वर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मोठी कारवाई

आषाढवारीत सहभागी दिंड्याना मिळणार अनुदान, CM Shinde यांचे निर्देश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss