‘पियूची वही’ कादंबरीला मिळाला साहित्य अकादमीचा पुरस्कार

देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष २०२२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.

‘पियूची वही’ कादंबरीला मिळाला साहित्य अकादमीचा पुरस्कार

पियूची वही

प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे (Sangita Barve) यांच्या ‘पियूची वही’ या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने आज वर्ष २०२२ च्या बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा केली.अकादमीचे अध्यक्ष डॉ चंद्रशेखर कंबार (Chandrashekhara Kambara) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २२ प्रादेशिक भाषांसाठी साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारांची निवड व घोषणा करण्यात आली.

रोजनिशी लिहीण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्यासारखे केले पाहिजे, या प्रेरणेतून पीयू नावाच्या मुलीला निसर्गातील वेगवेगळया गोष्टींची होणारी ओळख हे ‘पियूची वही’या कादंबरीचा विषय आहे. पीयू नावाची एक छोटी मुलगी रोजनिशी लिहिण्यासाठी काहीतरी केले पाहिजे,म्हणून सुटीच्या दिवशी खिडकी रंगवायला घेते आणि तिला रोजनिशी लिहिण्यासाठी एक कारण मिळते.

ब्रह्मास्त्रमधील रणबीर-आलिया यांचे केसरिया हे गाण ‘या’ अल्बमपासून प्रेरित आहे

मुलांनी दैनंदिनी लिहावी या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही मोठा आनंद आहे. या पुरस्कारामुळे हे पुस्तक आणखी मुलांपर्यंत पोहोचेल आणि ते वाचून मुले रोजचा दिनक्रम लिहिण्यास सुरूवात करतील. मुलांनी लिहिते व्हावे हाच या पुस्तक निर्मितीमागचा असलेला हेतू साध्य झाला आहे, अशारीतीने कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी आपला आनंद व्यक्त केला.

यावर्षी १४ नोव्हेंबर २०२२ या बालदिनी साहित्य अकादमीच्या विशेष कार्यक्रमात या पुस्काराचे वितरण करण्यात येईल. या पुरस्कारांमध्ये कोकणी भाषेसाठी लेखिका ज्योती कुंकळकर यांच्या ‘मयुरी’ या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

हे ही वाचा:

बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची शिक्षा माफ करुन त्यांचे स्वागत करणाऱ्या गुजरात भाजपा सरकारचा काँग्रेसकडून निषेध

फेसबुक अकाउंट हॅक झाले की बग? वापरकर्त्यांनी केल्या न्यूज फीड सेलिब्रिटी पोस्टसह स्पॅम झाल्याच्या तक्रारी

Exit mobile version