नाशिकचे खड्डे पोहचले उच्च न्यायालयात

नाशिक शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून शहरातील मुख्य भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील विविध भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककरांना प्रचंड त्रास होत आहे.

नाशिकचे खड्डे पोहचले उच्च न्यायालयात

नाशिक शहरात सध्या खड्ड्यांचे साम्राज्य असून शहरातील मुख्य भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील विविध भागात पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककरांना प्रचंड त्रास होत आहे. या त्रासातून नाशिककरांची सुटका व्हावी म्हणून भाजपाचे नेते दशरथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

नाशिक (Nashik) शहरात पाऊस (Rain) उघडला असला तरी पावसामुळे झालेल्या खड्ड्यांनी नाशिककर हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे नाशिक मनपाकडून (Nashik NMC) रोजच खड्डे बुजवण्याची धडाका सुरु आहे. असे असताना पुन्हा रस्त्यात खड्डे होत असल्याने अखेर नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील (Dashrath Patil) यांनी थेट कोर्टात धाव घेत खड्डयांविरोधात जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल केली आहे.

दरम्यान अधिकाधिक खड्डे असल्याने रोजच अपघात होत असून अनेकजण जखमी झाल्यानं कुटुंब उध्वस्त होत आहेत. खड्ड्यामुळे झालेल्या अपघात जखमी, मृत्युमुखी पडलेल्याना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. वारंवार विनंती विनंती करून, निवेदन देऊन, आंदोलन करून ही उपयोग नसल्याने याचिका दाखल केली आहे. तीन वर्षात रस्त्यावर खड्डे पडतातच कसे असा प्रश्न याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे आता नाशिक मनपा प्रशासन, बांधकाम विभागाच्या कारभाराचे पितळ उघडे पडणा असून शहरातील खड्ड्यांचे फोटो, व्हिडीओ उच्च न्यालाया पुढे सादर केले जाणार आहेत.

नाशिक शहरात यंदाच्या पावसाळयात खड्ड्यांनी रस्ते भरलेले पाहायला मिळाले. तर यासाठी मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचे मोहीम सुरूच आहे. मात्र पाऊस आला कि पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. तर खड्ड्यांमुळे शहरातील महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. शहरातही सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे असून दररोज चाकरमानी, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहेत. तर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत तास न् तास रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयाने २०१५ मध्ये दिलेल्या निर्देशांची सरकारी यंत्रणांनी अंमलबजावणी करावी. तसेच युद्ध पातळीवर खड्डे भरून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

 

हे ही वाचा :-

नितेश राणे स्वतःच्या बापाचे ऐकत नाही – किशोरी पेडणेकर

मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी, किरीट सोमय्या यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version