कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता; WHO मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन

कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता; WHO मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन

दिवाळीनंतर संपूर्ण देशात कोरोना वाढण्याची शक्यता WHO मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी भीती व्यक्त केली आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) नवीन XBB व्हेरियंटमुळे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत. सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांना एक्स.बी.बी व्हेरियंटबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, ‘ओमायक्रॉनचे ३०० हून अधिक उपप्रकार (Subvariant) आहेत. सध्या एक्स.बी.बी व्हेरियंटची चिंता आहे. एक्स.बी.बी व्हेरियंटमध्ये (XBB Sub-variant) रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता आहे. एक्स.बी.बी व्हेरियंटवर अँटीबॉडीज देखील त्यावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे एक्स.बी.बी विषाणूमुळे काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे.’

सध्या देशात नवीन व्हेरियंटचे अनेक रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यादरम्यान अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी सांगितलं आहे की, ‘सध्या सणासुदीचा काळ आहे. आपल्या अनेकांसोबत भेटीगाठी होतील. सध्या मास्क वापरणं अनिवार्य नसलं तरी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी नागरिकांनी खुल्या आणि गर्दीचिया ठिकाणी मास्क वापरावा.’ जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ओमायक्रॉनचा बीए.५ व्हेरियंटही जगभरात वेगाने पसरत आहे. नव्या रुग्णांमध्ये या व्हेरियंटचे जगभरात ७६.२ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या जगभरात कोरोना व्हेरियंटच्या तीन व्हेरियंटचा धोका पाहायला मिळत आहे. जगभरात बी एफ.७, एक्स.बी.बी आणि बीए .५ हे नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहेत.

 

हे ही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधल्या बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी दाखल

नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ? अजामीनपात्र वॉरंट!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version