सामान्यांना दिलासा, देशात खाद्यतेलाच्या किंमती मोठी घसरण

सामान्यांना दिलासा, देशात खाद्यतेलाच्या किंमती मोठी घसरण

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी लवकरच सामोर येऊ शकते. महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना या बातमीने आनंद मिळणार आहे. कारण देशात खाद्यतेलाच्या किंमती घसरण्याची शक्यता आहे. भारतात ऑगस्ट महिन्यामध्ये पामतेलाच्या (Palm Oil) आयातील ८७ टक्क्यांनी वाढ झाली झाली होती. तर सप्टेंबर महिन्यात १० लाख टन तेल आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

भारताने ऑगस्ट महिन्या विक्रमी तेल आयात केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेनं ऑग्सट महिन्यात भारतानं ८७ टक्के जास्त तेल आयात केलं आहे. ही मागील ११ महिन्यामधील सर्वाधिक आयात ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या किंमती ४० टक्क्यांनी घसरल्या आहेत. पामतेलाची किंमत १८००-१९०० डॉलर मेट्रिक टनवरून घसरून १०००- ११०० डॉलर मेट्रिक टन वर पोहोचली आहे.

हेही वाचा : 

अखेर शिंदेंच ठरलं, ‘आमचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर’ मुख्यमंत्र्यांचा निर्धार

इतर खाद्यतेलापेक्षा स्वस्त असलेले पामतेल अधिक प्रमाणात आयात केलं आहे. त्याचबरोबर देशात सणासुदीचा काळ आहे. महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली घट हा एक मोठाच दिलासा ठरणार आहे. खाद्य तेलावरील खर्च हा सर्वसामान्यांच्या दर महिन्याच्या घरगुती खर्चातील मोठा हिस्सा असतो. काही दिवसांवर नवरात्र,दसरा, दिवाळी आहे. त्यातच दिवाळीनंतर लग्नसराईचाही काळ येत आहे. या परिस्थितीत पामतेलाची मागणी आणखी वाढू शकते. त्यामुळे पामतेलाची आयात वाढली असून आगामी काळात खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तर केंद्र सरकारने पामतेलाच्या आयातीवर ५.५ टक्के कर लावला आहे. त्याचबरोबर सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाची आयात चालू आणि पुढील वर्षासाठी शुल्कमुक्त करण्यात आला आहे.

शिंदे गटातील ‘या’ मंत्र्याच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बाजवली नोटीस

Exit mobile version