Maharashtra Monsoon : राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी, उद्यापासून उघडीपीची शक्यता

Maharashtra Monsoon : राज्यात परतीच्या पावसाचा जोर कमी, उद्यापासून उघडीपीची शक्यता

राज्यातील काही जिल्ह्यात परतीचा पावसाळा सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणचे नदी,नाले व धरणे तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. परतीच्या पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. मुंबई पुण्यासह शहर परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.तर, काही ठिकाणी परतीच्या पावसाचा जोर ओसरला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून दिलेल्या अंदाजानुसार आजपासूनच परतीचा मान्सून परत फिरणार असल्यामुळे उद्यापासून (१५ ऑक्टोबर) राज्यात पावसाची उघडीप होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता कमी नाही. मात्र, सध्या पुणे मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण असून, पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा : 

Andheri East Bypoll 2022 : मुरजी पटेल हे भाजपच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज भरणार, ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंशी लढत

राज्यात खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान

परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या खरीपाच्या पिकांची काढणी सुरु आहे. सोयाबीन, कापूस, मूग तसेच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पिकांची काढणी सुरु असतानाच पावसानं हजेरी लावल्यानं उभी पिकं पाण्यात गेली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच द्राक्ष बागांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत.

रात्रभर एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाणे सोडलंच नाही, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा

ऑक्टोबरमध्ये किरोकोळ पावसाची शक्यता

दिवाळ सणादरम्यान साधारण २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान राज्यात किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर दिसून आला होता. रब्बी हंगामाच्या शेवटच्या आवर्तनातील किरकोळ पाऊस पडणार आहे. मात्र, उद्यापासून राज्यात न्सून माघारी फिरण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे. त्यामुळं राज्यात पावसाची उघडीप होणार आहे.

Diwali 2022 : दिवाळीत बनवा सोप्या पद्धतीने पौष्टिक “खजूरचे लाडू”

Exit mobile version