spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा वाढणार कोरोनाचा धोका! ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा…

भारतात गेल्या २४ तासात १९ हजार ४०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

भारतात सर्वत्र आता या महिन्यात विविध सण येत असल्यामुळे आणि त्यात कोरोनाचं सावट काहीसं कमी झाल्यामुळे लोकांनामध्ये आता वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे. पण कोरोनाच संकट काहीस कमी झाल्यापासून आणि सरकारने नियम काहीसे शिथिल केल्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा आता देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना कोरोना रुग्णांच्या वाढीबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा करोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या राज्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे व लसीकरणाचा वाढावा, अशा सुचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.

भारतात गेल्या २४ तासात १९ हजार ४०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पाच, छत्तीसगढमधील ३, दिल्ली, जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी दोन, तर हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर येत्या काळात भारतातील सण – समारंभांमुळे गर्दी वाढल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सध्या देशात एकुण संक्रमणापैकी ०.३१ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.५० टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.तसेच सणांच्या दिवसात स्वतःची काळजी घेणे आणि कोरोनाच्या संक्रमनापासून स्वतःला वाचवण्यासाठी सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजेचे असल्याचे केंद्र सरकार सांगण्यात आले आहे.

 

Latest Posts

Don't Miss