इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस हा सुरूच आहे. पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे.

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस हा सुरूच आहे. पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे.  त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर काही ओसरलेला नाही.

पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सध्या अनेक जिल्ह्यात शाळा पावसामुळे बंद ठेवण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे.  इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही राज्यातील अतिवृष्टीच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. यासंदर्भात परीक्षा परिषदेने एक पत्रक देखील जारी केले आहे.

हेही वाचा : 

खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची विमानतळावर गर्दी

२० जुलै रोजी संपूर्ण राज्यभरात ही परीक्षा होणार होती मात्र अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळेही शिष्यवृत्तीची परीक्षा आता 31 जुलै रोजी राज्यभरात घेतली जाणार आहे या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे 4,10,395 तर इयत्ता आठवीचे 2,99,255 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा रद्द करून 31 जुलै रोजी घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना दळणवळणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या बातमीची दक्षता घ्यावी असे आवाहन परीक्षा परिषद विभागाकडून करण्यात आले आहे.

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतच्या निवडणुकांना स्थगिती

Exit mobile version