spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका बसला आरोग्य सेवेला

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) पुकारलेल्या संपाला सोमवार दि . २ जानेवारीपासून सुरुवात झाली. या राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील आरोग्य सेवेला संपाचा फटका बसला.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) पुकारलेल्या संपाला सोमवार दि . २ जानेवारीपासून सुरुवात झाली. या राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील आरोग्य सेवेला संपाचा फटका बसला. संपापूर्वी नियोजित शस्त्रक्रियांपैकी निम्म्या शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या.

राज्यातील शासकीय १७, मुंबई महापालिकेची चार तर ठाणे महापालिकेचे कळवा येथील एक अशा २२ रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. साधारणत: आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी, ओपीडीमध्ये रुग्णसंख्या लक्षणीय असते. संपाची माहिती असल्याने काही रुग्णालयांत ही रुग्णसंख्या रोडावल्याचे चित्र होते. रुग्णांवरील उपचाराची धुरा प्राध्यापकांनी सांभाळली होती. तर ऑपरेशन थिएटर्समध्ये ५० टक्के डॉक्टरांची उपस्थिती होती. संपाचा दृश्य परिणाम ओपीडीतील उपचारांवर जाणवला. रुग्णांना उपचारांसाठी ताटकळावे लागत होते. मात्र, सगळ्यांना उपचार मिळाले. विशेष म्हणजे अनेक रुग्णांना या संपाची अगोदरपासून माहिती असल्यामुळे आणि नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नेहमीसारखे सोमवारच्या ओपीडीमध्ये रुग्णच आले नव्हते. महापालिकेच्या रुग्णालयात लांबच्या लांब रांगा होत्या.

निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलचा प्रश्न १५ जानेवारीपर्यंत मार्गी लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे डॉक्टरांना दोन दिवसांत कोविड भत्ताही सुरू केला जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सोमवारी दिली. या आंदोलनात डॉक्टरांनी सहभाग घेतला असला तरी या आंदोलनाचा परिणाम पूर्णपणे झाला नाही. रुग्णांची गैरसोय होणार नाही ओपीडी सुरू राहील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती असेही डॉ. संजीव कुमार म्हणाले. निवासी डॉक्टरांना १० हजार रुपये कोविड भत्ता देण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे तसेच डॉक्टरांसाठी हॉस्टेलमध्ये चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यात येणार असून लवकरच त्याच्या निविदा काढण्यात येतील, अशी माहिती डॉ. कुमार यांनी दिली.

निवासी डॉक्टरांचा संप सुरू असला तरी काही डॉक्टरांनी नियोजित शस्त्रक्रिया करण्यासाठी हातभार लावला होता. त्यामुळे फारसा त्रास या संपाचा जाणवला नसल्याचे महापालिकेतील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात ५० टक्के नियोजित शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच कूपर रुग्णालयाने अगोदरच संप माहीत असल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे संपामुळे अपेक्षित असणारा गोंधळ मात्र सोमवारी दिसला नाही.

हे ही वाचा:

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात घेणार चार सभा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss