‘या’ दोन मुद्द्यांवर PMLA निकालाचे पुनरावलोकन करणार सुप्रीम कोर्ट

गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ईडीचा अटकेचा अधिकार कायम ठेवला होता.

‘या’ दोन मुद्द्यांवर PMLA निकालाचे पुनरावलोकन करणार सुप्रीम कोर्ट

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट, 2002 च्या घटनात्मक वैधतेचे समर्थन करणाऱ्या 27 जुलैच्या निकालाचे पुनरावलोकन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी मनी लाँडरिंग कायद्यातील तरतूदी कायम ठेवल्या होत्या. तसेच ईडीच्या अटक आणि जामीनासाठीचे कठोर नियमही कायम ठेवले होते.

आता त्या निर्णयांविरोधात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणात दोन मुद्द्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे. पहिला मुद्दा म्हणजे ईडीने तपास अहवाल न देणे. याशिवाय आरोपींवर निर्दोषत्व सिद्ध करण्याचाही मुद्दा आहे. या मुद्द्यांवर विचार करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे.

इंडिगो पायलटची इंग्लिश आणि पंजाबीतील फ्लाइटमधील घोषणेचा व्हिडिओ इंटरनेटवर होतोय व्हायरल

न्यायालयाने अधोरेखित केले की “आरोपी/गुन्हेगाराच्या निर्दोषतेचे तत्व हा मानवी हक्क म्हणून गणला जातो” परंतु “त्या गृहीतकाला संसद/विधानमंडळाने केलेल्या कायद्याद्वारे प्रतिबंधित केले जाऊ शकते”.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ही सुनावणी खुल्या कोर्टात झाली, म्हणजेच मीडिया आणि सर्वसामान्यांना न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहण्याची मुभा होती. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ईडीचा अटकेचा अधिकार कायम ठेवला होता.

27 जुलै रोजी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती सी.टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने विजय मदनलाल चौधरी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरण आणि 240 याचिकांवर निकाल दिला होता. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम, महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री अनिल देशमुख, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही ईडीच्या अटक, जप्ती आणि तपास प्रक्रियेला आव्हान दिले होते.

हे ही वाचा:

आशिया चषक २०२२ सामन्यापूर्वी, विराट कोहलीचे महत्वपूर्ण वक्तव्य

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version