लवकरच कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, WHO ने दिली माहिती

कोरोनाच्या चौथ्या लाटे बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आता गंभीर इशारा दिला आहे.

लवकरच कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका, WHO ने दिली माहिती

मुंबई : कोरोनाच्या चौथ्या लाटे बद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आता गंभीर इशारा दिला आहे. अचानक वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबद्दल जागतिक आरोग्य संघटने याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट पासून सावधान राहण्याची गरज WHO कडून व्यक्त करण्यात आलेली आहे.

भारतात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 20,000 हून अधिक कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे. याशिवाय सक्रिय कोरोना रुग्ण आणि मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोणाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासनाची चिंता आता वाढली. कोरोना बरोबरच मंकीपॉक्स या व्हायरसचा देखील शिरकाव होत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग आता सतर्क झाले आहे.

हेही वाचा : 

राशी भविष्य 16 जुलै 2022 

महाराष्ट्रात 2 हजार 371 ऍक्टिव्ह रुग्ण

महाराष्ट्रात शुक्रवारी 2 हजार 371 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी राज्यात 2 हजार 914 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकीकडे राज्यात पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिक त्रासले आहेत. दिवसेगणित कोरोनाची वाढती रुग्णसंख्या येत्या काळात चौथ्या लाठीला आमंत्रण देत आहे.

पावसाळा आणि भजी: एक हटके कॉम्बिनेशन

Exit mobile version