पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात

पुणे येथील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) पुल पाडण्याची (Bridge Demolition) तयारी हि आजपासून सुरु झाली आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्याच्या कामाला आजपासून सुरुवात

पुणे येथील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) पुल पाडण्याची (Bridge Demolition) तयारी हि आजपासून सुरु झाली आहे. त्यासाठी पुलाच्या भिंतींमध्ये स्फोटकं भरावी लागणार आहेत. त्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रीलींग करुन होल्स पाडण्याचं काम सुरु झालं आहे.

स्फोटानंतर अवघ्या आठ दे दहा सेकंदांमध्ये हा पुल जमिनदोस्त होणार आहे. पण त्यानंतर जो राडारोडा तयार होणार आहे तो हटवण्यासाठी आठ ते दहा तास लागणार आहेत. या कालावधीत मुंबईहून – पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता द्यावा लागणार आहे. नवीन उड्डाणपूलाची पाषाण- बावधन कडे लेन तयार झालेली असली तरी जुना पुल पाडण्यासाठी मुंबईहून- पुण्याकडे येणाऱ्या महामार्गास एन एच ए आय ला पर्याय उपलब्ध करून द्यावा लागणार आहे आणि त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे.

नोयडा मधील ट्विन टॉवर जमीनदोस्त झाल्यानंतर पुण्यातील चांदणी चौक देखील जमीनदोस्त करण्याचे आदेश हे देण्यात आले आहेत आणि आज हा पूल पडण्याच्या कामकाजाला हि झाली आहे. पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल (Bridge Demolish) पाडण्यात येणार आहे. हा पूल १० सेकंदात पाडण्यात येणार आहे. पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक (Traffic) कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी edifice engineering या कंपनीचे कर्मचारी उद्या सर्वेक्षण करण्यासाठी या पुलाची पाहणी केली आहे. विशेष म्हणजे हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे होणार आहे.

चांदणी चौकात वाहतूक वळवली –

दिलेली वाहतूक वळवण्याची योजना या आठवड्यात तात्पुरत्या कालावधीसाठी आहे. जेव्हा चांदणी चौकातील जुना पूल पाडला जाईल. नंतर जुना पूल पाडल्यावर त्यावेळचे नवे मार्ग आणि वळण सार्वजनिक वापरासाठी प्रकाशित केले जातील, अशी माहिती NHAI पुणे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी

शिंदे व फडणवीसांच्या रात्रीच्या भेटी सुरुच, प्रभादेवीमधील वादावर चर्चा ?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Exit mobile version