spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आले बदल

राज्यामध्ये मधल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागत होत्या. दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यामध्ये मधल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागत होत्या. दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या वर्षीच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये (Board Exam) प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थाना दहा मिनिटे वाढवून मिळणार आहेत. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेच्या वेळेत बदल झाला आहे. या आधी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डच्या परीक्षेला प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी वाचण्यासाठी दिली जात होती. यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने निर्धारित वेळेच्या आधी १० मिनिटे प्रश्नपत्रिका देण्याचा नियम हा बोर्डाने रद्द केला आहे.

विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे असे पालकांचं मत आहे.त्यामुळे पेपरच्या आधी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेत दिली जात असे तो नियम रद्द केल्याने पेपरच्या नंतर १० मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशी मागणी पालकांनी केली होती. त्या नंतर हि मागणी मान्य करण्यात आली होती. या संदर्भात बोर्डाने वेळापत्रकामध्ये सुधारणा केली. आणि त्यानुसार निर्धारित वेळेनुसार १० मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे बोर्डाने याबाबत परिपत्रक काढून हा निर्णय जाहीर केला आहे .दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यासाठी बोर्डाने परीक्षेच्या वेळेमध्ये बदल केले आहेत.

जाणून घ्या १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत सुधारित वेळ

सकाळी ११ ते दुपारी २.१० वाजेपर्यंत
सकाळी ११ ते दुपारी १.१० वाजेपर्यंत
सुधारित वेळ सकाळी ११ ते १.४० वाजेपर्यंत

दुपारच्या सत्रातील १०वी आणि १२वी परीक्षेत सुधारित वेळ

दुपारी ३ ते सायंकाळी ६.१० वाजेपर्यंत
दुपारी ३ ते सायंकाळी ५.१० वाजेपर्यंत
दुपारी ३ ते सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss