spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र थंडीची लाट येण्याची शक्यता, पश्चिमी प्रक्षोभामुळे होणार राज्यातील तापमानात मोठी घट

पश्चिमी प्रक्षोभाचे उगम हे तुर्कस्थान , युक्रेन आणि कला समुद्र यात होतो. सध्या या प्रक्षोभाने त्याची दिशा भारताकडे वळवली आहे. आता तुम्ही म्हणाल की हा पश्चिमी प्रक्षोभ म्हणजे काय. पश्चिमी प्रक्षोभ म्हणजे उत्तरेकडील जमिनीवरचे चक्रीवादळ (Northern Land Cyclone) यालाच पश्चिमी प्रक्षोभ (Western Disturbance) असे म्हणतात. सध्या हे पश्चिमी प्रक्षोभ हे पाकिस्तानच्या जवळ आलं असून तिथून ते भारतात येणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रातही थंडीची लाट येणार आहे.

पश्चिमी प्रक्षोभ (Western Disturbance) म्हणजेच उत्तरेकडील जमिनीवरील जे वादळ ज्या ठिकाणी जाते त्या क्षेत्रात पाऊस थंडी आणि धुके या तिन्हींचा प्रभाव पाडते. हे एक चक्रीवादळ (Cyclone) आहे. आणि हे थंडी आणि पाऊस या दोन्हीही गोष्टी एकत्र घेऊन येत त्यामुळे ज्या क्षेत्रात हे वादळ जाईल त्या क्षेत्रात गार देखील पडण्याची शक्यता आहे. आणि मुख्य म्हणजे हे वादळ लवकरच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार आहे. आणि हवामान तज्ज्ञांनुसार हे वादळ पाकिस्तान मधून भारतात येणार असल्याचे सांगितलं जात आहे. हे वादळ पुढील चार दिवसात पाकिस्तान मधून भारताच्या काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात दाखल होण्याची शक्यता दर्शवली जाते आहे. म्हणून याचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होऊ शकतो. महाराष्ट्रातील तापमानातं कमालीची घट होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडी वाढणार आहे. त्यामुळे या वर्षीच्या नाताळात मागील वर्षांपेक्षा अधिक थंडी असण्याची शक्यता आहे.

दार वर्षी नातलमध्ये कडाक्याची थंडी असते पण भारतातील थंड प्रदेशांच्या प्रमाणात महाराष्ट्रात मात्र कमीच थंडी असते. या वर्षी महाराष्ट्रातील लोकांना जरा वेगळा अनुभव घ्यायला मिळणार आहे. इतर वर्षांप्रमाणे या वर्षीच्या नाताळात राज्यातील तापमानातं जरा जास्त घट असणार आहे.

हे ही वाचा : 

Rakhi Sawant घरातल्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉस राखी सावंत दाखवतील का बाहेरच्या रस्ता?

अजित पवारांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut सरकार बदलणार सर्वांचा हिशोब पूर्ण होणार, मविआच्या मोर्चाला परवानगी न मिळाल्याने संजय राऊत संतापले

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss