राज्यात पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात पुढील तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : गेल्या दोन आठवड्यापूर्वी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे मुंबई सह उपनगरे ठाणे,पालघर पुणे,पश्चिम महाराष्ट्र,विदर्भात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते नदी नाल्यांना पूर आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर मराठवाडा विदर्भात गडचिरोली येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पावसाच्या या जोरदार हजेरीमुळे काही गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले होते. 1 जून पासून राज्यभरात पावसामुळे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान खात्याने येत्या शनिवार रविवारी राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसात पावसाची स्थिती ही मध्यम स्वरूपाची असणार आहे. मुंबई ठाणे पालघर परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाची सततधार रसुरू होणार आहे.

हेही वाचा : 

जगातील सर्वात वयस्कर पांडाने घेतला शेवटचा श्वास…

Exit mobile version