spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई – पुणे लोहमार्गावर कोसळली दरड

मुंबई - पुणे लोहमार्गावर (Pune Mumbai Railway)  दरड कोसळली आहे. खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई :-  मुंबई – पुणे लोहमार्गावर (Pune Mumbai Railway)  दरड कोसळली आहे. खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिरानं धावत आहे. लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (lonavla khandala land slide on pune mumbai railway traffic stopped)

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज १२ ऑगस्ट रोजी लोणावळ्या (Lonawala) नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा हि ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्यानं मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिरानं धावत आहे. सकाळी सहा नंतर पुण्याहून निघालेल्या रेल्वे खंडाळ्याला थांबल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याला येणाऱ्या रेल्वे कर्जतला थांबविल्या आहेत.

हे ही वाचा :- 

राज्यात पावसाची दमदार हजेरी

Latest Posts

Don't Miss