spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Republic Day यंदा प्रजासत्ताक दिन परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (Republic Day Parade) त्या-त्या राज्यांची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सादर केले जातात. महाराष्ट्रही विविध थिमवर आधारित चित्ररथ सादर करत असतो.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (Republic Day Parade) त्या-त्या राज्यांची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सादर केले जातात. महाराष्ट्रही विविध थिमवर आधारित चित्ररथ सादर करत असतो. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडसाठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाहीये, त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) दिसण्याची शक्यता कमी आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या (Republic Day 2023) परेडमध्ये दरवर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण यंदा परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय पण त्यात महाराष्ट्राचा (Maharashtra) समावेश नाही. राज्यांची संख्या अधिक असल्यामुळे दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. यंदा महाराष्ट्राने साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीने निवड होत असल्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी संधी नसणार आहे. यापूर्वी २०२० मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नव्हता. त्यानंतर दोन वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरचं हे संचलन ठराविक वेळेतच पूर्ण व्हावं लागतं, त्यामुळे दरवर्षी ठराविक राज्यांनाच यात संधी मिळते.

अंतिम १४ राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजपशासित नसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ने आक्रमक भूमिका घेतलेली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंती मध्ये पहिला क्रमांक मिळाला होता. याआधी २०२० मध्ये देखील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये दिसणार नाही. १९७१ ते २०२२ या ५१ वर्षाच्या काळात महाराष्ट्राने ३८ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे. यासाठी महाराष्ट्राला १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे. यंदा मात्र महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथ नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीची काही वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर महाराष्ट्राचा या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. १९८० मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक मिळवला होता. तसेच १९८३ मध्ये बैलपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथानेही क्रमांक पटकावला होता. त्यानंतर १९९३ , १९९४, १९९५ अशा सलग तीन वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात क्रमांक पटकावला होता. तसेच पंढरीच्या वारीवर साकारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. तसेच त्यानंतर २०१८ मध्ये साकारण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकावला होता. गेल्या वर्षीचा चित्ररथ जैवविविधता या विषयावर आधारित होता. २०२० साली चित्ररथावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले होते.

हे ही वाचा : 

India Coronavirus कोरोनाचा धोका वाढला, आज केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

Coronavirus in China चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ! व्हिडीओ होतोय व्हायरल

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss