spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमधील ‘हे’ मार्ग आहेत बंद

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

नागपूरमध्ये (Nagpur) आजपासून हिवाळी अधिवेशनाला (Winter sessions) सुरुवात झाली आहे. या अधिवेशनकाळात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. यंदा वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या जास्तच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अधिवेशन काळात नागपुरात प्रचंड वाहतूक कोंडी होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरात विधिमंडळाकडे येणारे मोठे मोर्चे ज्या मार्गावरून येतात, असे काही मार्ग सध्या नादुरुस्त पूल आणि उखडलेले रस्ते या कारणामुळे बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये अधिकची वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) कसे नियोजन केले जाते हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

शहरातील पंचशील चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता २३ सप्टेंबरच्या पुरानंतर बंद ठेवण्यात आला आहे. या मार्गावरील पंचशील चौकाजवळचा पूलाचा भाग पुरामध्ये खचला होता. तेव्हापासून या मार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मार्गावरून अधिवेशनावर धडकणारे सर्वात मोठे मोर्चे यशवंत स्टेडियमवरून विधिमंडळापर्यंत येतात. आता हा मार्ग बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाने मोर्चे वळवावे लागतील. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

पंचशील चौकाच्या बंद असलेल्या रस्त्याला समांतर रस्ता म्हणजे रामदास पेठेतून महाराज भागकडे जाणारा रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावरील युनिव्हर्सिटी लायब्ररी जवळचा पूल खचल्यामुळे गेले अनेक महिन्यांपासून हा रस्ता बंद आहे. तिथे अत्यंत हळुवार गतीने काम सुरू आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अवतीभवती मोर्च्यांची गर्दी असताना रामदासपेठेतून महाराजबागकडे येणारा रस्ता सामान्य नागपूरकरांसाठी उपलब्ध असायचा.मात्र, सध्या नादुरुस्त पुलामुळे हा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे.गांधीसागर आणि सेंट्रल एवेन्यूकडून येणारे मोर्चे रेल्वे स्टेशन जवळच्या किंग्स-वे मार्गातून मोहिनी कॉम्प्लेक्स जवळ येऊन थांबायचे. मात्र, किंग्स-वे वर एका बाजूला सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे, त्या रस्त्यावरून येणारे मोर्चेही येऊ शकणार नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे.

हे ही वाचा:

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर झालेल्या आरोपांवरून विरोधकांवर निशाणा साधला

रणबीरच्या ‘ॲनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुमधमाका, सहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss