टॅटू काढायचा विचार करत असाल ? तर ही माहिती नक्की जाणून घ्या

टॅटू काढायचा विचार करत असाल ? तर ही माहिती नक्की जाणून घ्या

मुंबई : पूर्वी शरीरावर गोंदवून घेण्याची पद्धत होती. आताच्या युगात त्यातच बदल होऊन तरुणांमध्ये शरीरावर टॅटू काढण्याचा ट्रेंड आला आहे. आणि याचे प्रमाण देखील आता तितकेच वाढले आहे. मात्र, टॅटू काढणाऱ्यांच्या हलगर्जीमुळे काही जणांवर आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. टॅटू काढण्यासाठी एकाच सुईचा वारंवार वापर केल्यामुळे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये काहीजणांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. टॅटू काढणे 14 जणांच्या जीवावर बेतला आहे. हि 14 जण अचानक आजारी पडले. त्यांना ताप आला. त्यानंतर टाईफाईडआणि मलेरियाचीही तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ताप कमी होत नसल्यामुळे अखेर त्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून सर्वांना एचआयव्हीचा संसर्ग रोग झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एका एचआयव्हीग्रस्तांनी टॅटू काढले होते. आणि त्याचीच सुई इतर व्यक्तींना वापरण्यात आली. धक्कादायक प्रकार म्हणजे टॅटू काढणाऱ्याने पैसे वाचविण्यासाठी एकाच सुईचा वापर केला होता. टॅटू काढण्यासाठी लागणारी सुई महाग असते. त्यामुळे अनेकजण एकाच सुईचा अनेकांवर वापर करतात. हा प्रकार अतिशय धक्कादायक आणि तितकाच धोकादायक आहे.

हेही वाचा : 

आलियाने पहिल्यांदाच दाखवले बेबी बंब

Exit mobile version