महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘या’ महाराजाला अटक…

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब (Kalamb) तालुक्यातील मलकापूर (Malkapur) येथील एकनाथ लोमटे (Eknath Lomte) महाराजाविरोधात २८ जुलै २०२२ रोजी पीडित भक्त महिलेने तक्रार दाखल केली होती.

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘या’ महाराजाला अटक…

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब (Kalamb) तालुक्यातील मलकापूर (Malkapur) येथील एकनाथ लोमटे (Eknath Lomte) महाराजाविरोधात २८ जुलै २०२२ रोजी पीडित भक्त महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा (molestation) गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील ३५ वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती.

महाराजांनी महिलेस प्रवच खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता. या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना अटक ही झाली होती. मात्र त्यांची जामीन्यावर सुटका झाली. पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज यांना पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता लोमटे महाराजाला अटक केली गेली आहे.

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्तांना बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे. महाराजांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध पक्षांचे मोठे-मोठे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज यांना अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा:

Gadar 2 ने रचला इतिहास, स्वातंत्र्यदिनी बंपर कमाई करून मोडले विक्रम

Raj Thackrey LIVE: मनसेचा पनवेलमध्ये निर्धार मेळावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version