spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनोज जरांगे पाटील यांच्यावर ‘या’ महिलेने केले गंभीर आरोप, म्हणाली…

मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकाने मनोज जरांगेंवर आरोप केले आहेत.

सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र दिसून येत आहे. मंगळवार, दिनांक २० फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणासंदर्भात असलेले विधयक हे विशेष अधिवेशनामध्ये समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. परंतु आता मनोज जरांगे-पाटील यांच्यावरच आरोपांची रांग चालू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकाने मनोज जरांगेंवर आरोप केले आहेत.

मराठा आंदोलनकर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे सध्या अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यावेळी बोलत असताना संगीता वानखेडे म्हणाल्या की, मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवलं. तिथे अंतरवालीत दंगल घडली की घडवली गेली?, सरकारने शोध लावावा. मनोज जरांगे कोण हे मिडीयाला सुद्धा माहिती नव्हतं. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून, मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केलं होतं. तेव्हा ते लोकं मला गलिच्छ भाषेत बोलत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. मी त्यांचा विरोध करतेय, असं त्या म्हणाल्या.

शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता. मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून, अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगे अख्खं पुणे फिरले. शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे-पाटील करतात. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत, असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला आहे. पण आता एक ते दीड महिन्यांपासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करत आहे. फक्त एक फोन ज्याचा येत होता, त्यांना मनोज विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवारांचा होता, असं संगिता वानखेडे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss