आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०६% एवढे झाले आहे

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

राज्यात जीवघेण्या करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. अशात आता महाराष्ट्रात २४ तासांत रुग्णांचा मोठा आकडा पुढे आला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नागरिकांना काळजी घेण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७८,४६,६९४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०६% एवढे झाले आहे. राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या आठ हजार सहाशे ९४ सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई ३१८३, ठाणे २००१ आणि पुण्यात १६८१सक्रीय रुग्ण आहेत. तर जळगावमध्ये तीन, हिंगोली आणि नंदूरबारमध्ये पाच पाच सक्रीय रुग्ण आहेत.

देशातील कोरोनाची स्थिती

देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ६५१ रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशातील उपचाराधीन असलेल्या कोरोना रुग्णांची संख्याही घटली आहे. सध्या देशात ५६ हजार ८४५ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५ लाख २७ हजार ९६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात नोंद झालेल्यांपैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २१३ कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

नितीश कुमार उभ्या जन्मात पंतप्रधान होणार नाही ; मोदींचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version