spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कंत्राटी भरती विरोधात लातूरमधील हजारो विद्यार्थी आक्रमक

लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्याच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

लातूर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आज विद्यार्थ्याच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश तातडीने मागे घ्यावा, यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले होते. कंत्राटी भरती संदर्भातील शेवटचा मोर्चा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेत्तृत्वाखाली मुंबईत होणार आहे. या मोर्चासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थीं हजर होते. शाळा वाचवा, कंत्राटी नोकर भरती रद्द करा से फलक घेत हजारो विद्यार्थीं रस्त्यावर उतरले आहेत. देशभरातील खाजगीकरण थांबवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शंभरातील खासगीकरण तात्काळ बंद करावे, कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या रद्द करा, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे थांबवा, अनेक परीक्षा एक परीक्षा शुल्क असे धोरण सरकारने स्वीकारावं यांसारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मोर्चाला टाऊन हॉल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरुवात होणार आहे. या मोर्चसाठी सर्व विद्यार्थी टाऊन हॉल पासून जुने जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत चालत सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. तसेच या मोर्चाला तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे. राज्यभरात वेगवेगळ्या परीक्षेंसाठी हजारो रुपये शुल्क आकारण्यात येतो. अश्यावेळी काही विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येते.त्यातच पेपर फुटीसारखी प्रकरण चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे असे मत प्रा.विठ्ठल कागणे यांनी व्यक्त केले आहे.

 आज देशातील राजकीय स्थिती पाहता हे एक आशादायक चित्र नाहीये. पण देशातील तरुण आता जागरूक झाला आहे. त्याला सर्व प्रकारच्या स्थितीची उत्तम जाणीव आहे. ते विचार करत आहेत. गोरगरीब आणि वंचिताची ही मुले आता पेटून उठली आहेत.त्यांना सरकारची ध्यये धोरणे लक्षात येत आहे ..ते याच्या विरोधात उभे राहतील..यामुळे ह्या मोर्चाला ही गर्दी झाली आहे..देशात सर्वत्र हीच स्थिती आहे. आम्ही कंत्राटी करणास विरोध करणारच असे सुजित आंबेडकर यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा: 

उल्हासनगर मध्ये घडला धक्कादायक प्रकार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

नाशिक ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंनी दिले कारवाईचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss