spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अहमदनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण, शिर्डीत अचानक कलम १४४ लागू

शिर्डीमध्ये पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेच्या प्रश्न आता निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने आता सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी हॉटेल व्यावसायिक चालक मालक यांची बैठक घेत आदेश दिले आहेत. हॉटेल व्यवसायिकांसह ग्रामस्थांच्या बैठकीत सक्त सूचना दिल्या आहेत. शिर्डीत कोणत्याही ओळखपत्राशिवाय रूम मिळत असल्याचे माहिती मिळाल्यास कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले. त्याच बरोबर रूम देताना ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रूम दिल्यास १४४ सी आर पी एफ कलम तसेच, आदेशाप्रमाणे १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिर्डीतील हॉटेल व्यासायिकांचे धाबे दणाणले आहे. तर शिर्डीतील सुरक्षा आढावा घेत अनेक सूचना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी बैठकीत केल्या आहेत.

हेही वाचा : 

देशद्रोही याकूब मेमनच्या वादग्रस्त कबरीवर कारवाई सुरु, सात वर्षांनी राजकारण तापलं

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भाविकांवरही आता पोलीस नजर ठेवुन आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक राहण्यासाठी हॉटेल, रिसॉर्ट बुक करतात. पण यावेळी त्यांची संपुर्ण तपासणी केली जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने काही ठोस पावले तातडीने उचलली गेली आहेत. तसेच सिम कार्ड विक्रेत्यांनी देखील योग्य कागदपत्रांशिवाय सिम कार्ड वितरीत केले गेले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी देखील परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवून काही संशायस्पद आढळल्यास अथवा वाटल्यास पोलिस प्रशासनाला कळवावे अशा प्रकारे पोलिसांनी आवाहन केले आहे.

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील अमरावतीमधील पीडित युवती अखेर सापडली

महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथक , अहमदनगर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी एकत्रित मिळून एक मोठी कारवाई केली. शिर्डीतून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव राजिंदर असे असून तो पंजाबमधील असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्याला महाराष्ट्र एटीएसने पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

दक्षिण भारतातील ओनम सणाच्या दिवशी, बळीराजा येतो प्रजेला भेटायला

Latest Posts

Don't Miss